कुसुंबा येथील एकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

किशोर जालमसिंग चौधरी (वय-४५) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत माहिती अशी की, किशोर चौधरी हा आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा येथे वास्तव्याला आहे. शहरातील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होते. सध्या गेल्या पाच महिन्यांपासून ते घरी होते. शुक्रवारी १५ एप्रिल रोजी दुपारी घरात कुणीही नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. मोठ्या भावासह शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.  याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content