शिरसोली रोडवर विचित्र अपघातात तीन जण गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीजवळ ओव्हरटेक करताना तिहेरी अपघातात रिक्षा चालकासह दुचाकीवरी दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकी महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली रोडवरील जैन व्हॅलीसमोरून रिक्षा (एमएच १९ व्ही ५५८३) ने रिक्षा चालक अय्याज शेख शहानुद्दिन शेख (वय-३५) रा. शनीपेठ जळगाव हे शुक्रवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रिक्षाने शिरसोलीकडून जळगावकडे जात होते. त्यावेळी त्याच्या रिक्षाच्या मागे दुचाकीने विजय मधूकर चौधरी आणि चेतन रघुनाथ भावसार दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी हे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, रिक्षाच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या कार (एमएच १२ टीएच २२९५) ला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघे हे रिक्षावर आदळले. त्यामुळे रिक्षा देखील पलटी झाली. या विचित्र अपघातात रिक्षाचालकासह दुचाकीवरी दोघेजण गंभीर जखमी झाले. तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

 

Protected Content