शेताच्या बांधावरील ठिंबक नळ्यांना लावली आग तर पाईपांची केली तोडफोड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लमांजन येथील शेतकऱ्याच्या शेतातील ठिंबक नळ्या आणि पाईपाचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लमांजन येथील रहिवाशी पुंडलिक दामू खामकर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील लमांजन शिवारातील गट नं. १५०/३ आणि १६६ मध्ये शेत आहे. शेतात पिक काढण्यात आल्यानंतर त्यांनी शेतातील ठिंबकच्या नळ्या शेतातच्या बांधावर गोळा करून ठेवलल्या होत्या. गुरूवार १४ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजता शेतातील काम आटोपून पुंडलिक खामकर हे घरी आले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील बांधावर ठेवलेले ठिंबक नळ्या पेटवून दिले आणि शेतातील पाईपाचे साहित्यांची तोडफोड करण्यात आली. शुक्रवारी १५ एप्रिल रोजी सकाळी पुंडलिक खामकर हे शेतात गेले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content