गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लमांजन शिवरातील गिरणा नदी पात्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. तरूणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, मोहन उर्फ रोहित अशोक पाटील (वय-२०) रा. थोरगव्हाण ता. यावल हा तरूण आई, वडील भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. चोपडा तालुक्यातील वडी येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. आयटीआय सोबत असलेल्या मित्रांसोबत शुक्रवार १५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील लमांजण शिवारातील गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी मोहनने अंगवरील कपडे काढून गिरणा नदी पात्रात उडी घेतली. नदी पात्रात उडी घेताच त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा पाण्यातच मृत्यू झाला. दरम्यान ही बाब सोबत असलेल्या मित्रांना समजल्यानंतर त्यांला नदीपात्रातून बाहेर काढले व खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही. मयत मोहनच्या पश्चात आई रेखा, लहान भाऊ गौरव व वडील अशोक पाटील असा परिवार आहे.

Protected Content