किरकोळ कारणावरून दोन चुलत भावांना मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला व त्याच्या चुलत भावाला दगड आणि लोखंडी आसारीने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शुक्रवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शोएब खान अहमद खान आणि अहमद शेख निसार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी शोएब खान अहमद खान यांचा चुलत भाऊ जावेद खान हमीद खान हा भांडण सोडवण्यासाठी आला. याचा राग आल्याने अहमद शेख निसार, सन्वर शेख सत्तार, जावेद शेख अजिज, नूर शेख गफ्फार, मुस्ताक शेख अब्दुल रहीम, रफिक शेख अब्दुल रहीम आणि इमरान शेख गफ्फार सर्व रा. पाळधी यांनी दगडाने आणि लोखंडी असारीने जावेद खान आणि त्याचा चुलत भाऊ शोएब खान या दोघांना बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या दोघी चुलत भावांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी जावेद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे अहमद शेख निसार, सन्वर शेख सत्तार, जावेद शेख अजिज, नूर शेख गफ्फार, मुस्ताक शेख अब्दुल रहीम, रफिक शेख अब्दुल रहीम आणि इमरान शेख गफ्फार सर्व रा. पाळधी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content