समता नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । वाळू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या ३० वर्षीय तरूणाने कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समता नगरात उघडकीला आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजू पन्नालाल यादव रा. समता नगरात असे मयत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती शी की, जळगाव शरातील समतानगर परिसरातील राजु पन्नालाल यादव (वय 30) हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. राजु यादव यांचे जळगाव शहरातील आटोनगर मध्ये डंपर बॉडी चेसेस रिपेरिंगचे गॅरेज आहे.  याने एका व्यक्ती जवळून एक ते दीड वर्षापूर्वी रेतीचे डंपर विकत घेतले होते. सदर या डंपरला दुरुस्तीसाठी राजु यादवने जवळपास ३ लाख रूपये खर्च केला होता.  ज्या व्यक्तीकडून डंपर विकत घेतले होते. त्याला ५० हजार रूपये देण्याचे बाकी होते. या कारणामुळे राजू गेल्या काही दिवसांपासून तणावात होता.  गुधवारी रात्री राजूने आपल्या परिवारासह जेवण केले. घरात मागच्या खोलीत जावून रात्री 11 वाजता राहात्या घरात कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई , तीन बहिणी, मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content