मतदानासाठी अशी ही जिद्द; ९० वर्षांच्या आजींनी मतदान केंद्र पायी गाठत केले मतदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावमध्ये १३ मे रोजी आज लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. जळगावमध्ये सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जळगावमध्ये एका ९० वर्षांच्या आजीबाईचा मतदानाचा उत्साह तरूणांसाठी प्रेरणा ठरत आहे.
सकाळच्या सुमारास जुने जळगाव येथील द्वारकाबाई रुपचंद चौधरी या ९० वर्षांच्या आजींना दहा पावलेही चालण्यामध्येही अडचण होते. तरीही त्यांनी काठीचा आधार घेत मतदान केंद्र पायी गाठत मतदानाचा हक्क बजावला. त्या आपल्या नातेवाईकांसह जुने जळगावातील पांझरापोळ टाकीजवळ शाळा क्र.३ केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पाहून तरूणांनी प्रेरणा घेतली पाहिजे.

Protected Content