बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारामतीमध्ये एका युवा जोडप्याचा लुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामतीमध्ये शिकण्यासाठी आलेले युवक-युवती फिरण्यासाठी गेले होते. ही दोन्ही बारामती विमानतळाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली असता, गाडीत गप्पा मारत बसलेल्या या दोघांना 30 ते 35 वयोगटातील दोन व्यक्तींनी हटकले. त्यानंतर, तिच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील दागिने असा नव्वद हजारांचा ऐवज काढून घेतला. युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने आरोपीनी लंपास केले आहे.
यावेळी, आरोपीने तिच्या मित्राला दगडाने मारहाण करत दोघांनाही गाडीतून बाहेर काढले व एका खड्ड्यात नेऊन अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला भाग पाडले. तसेच,नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात 394 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावेळी दोन अज्ञात आरोपींनी त्यांना लुटले. आरोपींनी दोघांकडील पैसा व दागिने लुटल्यानंतर दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावले. त्यानंतर नको त्या अवस्थेत दोघांचे फोटो काढून घेतले आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारामती तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० मे रोजी शुक्रवारी रात्री ७ ते ८ वाजता ही घटना घडली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
फिरण्यासाठी गेलेल्या युवाजोडप्यांना अंगावरील कपडे काढून लुटले
7 months ago
No Comments