गुप्तधन शोधणाऱ्या पाच जणांना अटक; २ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्हयात गुप्त धन शोधणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेळया ठोकल्या आहे. काही दिवसांपासून जिल्हयातील ढाणकी परिसरात गुप्त धन शोधणाऱ्या टोळीची चर्चा होती. गुप्त धन मिळवून देण्याच्या नावाने अघोरी विद्या आणि अंधश्रद्धा पसरवून लोकांची लूट करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान एका गुप्त माहितीच्या आधारे बिटरगाव पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकत पाच संशयितांना अटक केली आहे.
.जीवन गोविंद जाधव (रा. टेंभुरदरा), संतोष हरीसिंग राठोड (रा. बाळदी),अभिजीत गणेश मामीडवार (रा. ढाणकी), सर्वजीत कांनबा गंगरपाड ( रा. ढाणकी) आणि पंडित विश्वनाथ राठोड (रा. चिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, एक चाकू असा २ लाख ८ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Protected Content