उद्या दिसणार चंद्रग्रहण 

moon

नवी दिल्ली प्रतिनिधी । उद्या 16 जुलैला या वर्षामधील 2 रे चंद्रग्रहण असणार आहे. कधी सुरुवात होणार, कुठे आणि कसं चंद्रग्रहण दिसणार आहे. तसेच वेध केव्हा सुरु होणार आहे.

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असून जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येते. परंतू ते तिन्ही एका सरळ रेषेत येत नसून, यापरिस्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडून चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही. अंधार पडण्यास सुरुवात होते, तेव्हा त्या परिस्थितीला ‘चंद्रग्रहण’ असे म्हणतात. हे चंद्रग्रहण 16 जुलै ते 17 जुलैच्या दरम्यान असून ते रात्री 12 वाजून 13 मिनिटांनी चंद्र सूर्याच्या सावलीखाली झाकला जाणार आहे. 1 वाजून 31 मिनिट 43 सेकंदांनी चंद्रग्रहण सुरू होणार आहे. दिल्लीतील नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत दिसणार आहे. या चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. खंडग्रास चंद्रग्रहण हे डोळ्यांनी पाहता येणार आहे. टेलिस्कॉपच्या मदतीने हे दृष्य अत्यंत सुंदर दिसणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण पाहायचं असल्यास अंधार असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन चंद्रग्रहण पाहू शकतात. हे चंद्रग्रहण जवळपास 3 तास सुरू राहिल. खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी ग्रहणाचे वेध लागण्यास सुरुवात होते आहे. मंगळवारी 16 जुलै रोजी सकाळी 4.30 वाजता ग्रहणाचे वेध लागणार असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे.

Protected Content