जळगाव (प्रतिनिधी) :अमृत योजनेतील कामांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात सत्ताधारी नागरसेवक, विरोधी नगरसेवक, अधिकारी यांची आज महापौर सीमा भोळे यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात शहर अभियंते भोळे यांनी संपर्क उत्तर न दिल्याने आ. राजूमामा भोळे संतप्त झाले होते.
या बैठकीत अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात मनात अमृत योजनेच्या कामांमुळे तयार होणाऱ्या खड्ड्याबाबत तक्रारी होत्या त्या तक्रारी बैठकीद्वारे दूर करण्यात आल्याची माहिती आ. भोळे यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. कॉलनी परिसरात मुरूम, खडी टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहर अभियंता भोळे यांनी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना भेटून प्राधान्यक्रमानुसार काम करावे. अमृत योजना सोडून जेथे खडडे आहते ते डांबर टाकुन बुजविण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिली असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहापौर अश्विन सोनावणे, आयुक्त उदय टेकाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, डॉ.चंद्रशेखर पाटील, नागरसेविका उज्ज्वला बेंडाळे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, शहर अभियंता एस. .एस. भोळे, उपअभियंता डी. एस. खडके, जैन इरिगेशन सि. ली. चे पंकज बऱ्हाटे,,एन. जी. ललवाणी, डी. एच. चौधरी, देवेंद्र पटेल, दीपक घाटोळ, दीपक जामोदकर आदी उपस्थतीत होते. या बैठकीत आमदार राजूमामा भोळे, यांनी अमृत योजने संदर्भातील यंत्रणांनी समनव्याने अडचणी सोडाव्यात अशी भूमिका घेतली. मक्तेदारांना त्यांच्या अडचणी काय आहते याची विचारणा आ. भोळे यांनी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी सहकार्य करीत नसल्यची तक्रार करण्यात आली. याबाबत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीकत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता भोळे यांनी सांगितले. यावर आ. भोळे संतप्त होऊन लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय आमच्या समोर का मांडण्यात आला नाही याची विचारणा केली. अमृत योजनेसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली.