राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ‘या’ दिग्गज नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप, शिवसेना (शिंदे गट) कडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तर महायुतीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार घोषीत होणे बाकी होते. त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते त्यांच्या खासदारीचा राजीनामा देणार असून उद्या उमेदवारी अर्ज सादर करतील, असे तटकरे यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रफुल्ल पटेल असतील असेही तटकरे यांनी सांगितले.

महायुतीकडून आतापर्यंत राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सहाव्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी आधीच दिले आहेत. त्यामुळे महायुतीने सहाव्या जागेसाठी खरंच उमेदवार दिला तर लढत चुरशीची होईल. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या देखील नावाची चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Protected Content