फिजीशियन डॉ. विश्‍वेश रोठे यांची विघ्नहर्तामध्ये नियमित सेवा ( व्हिडीओ )

dr vishvesh rothe पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये फिजीशियन डॉ. विश्‍वेश रोठे यांची सेवा उपलब्ध असून याचा परिसरातील रूग्णांना लाभ होत आहे.

डॉ. विश्‍वेश रोठे यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. केल्यानंतर यानंतर एम.डी. व डी.एन.बी आदी पदव्या संपादन केल्या आहेत. गत एक वर्षापासून ते पाचोरा येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत आहेत. येथे ते फिजीशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत डॉ. पियुष अग्रवाल हे फिजीशीयन, हॉस्पीटलचे सीईओ आणि डॉ. अंबिका यांचा चमू विघ्नहर्तामधील रूग्णांची सेवा करत आहेत. यात किडनी, हृदय, पोट आदींशी संबंधीत विकारांसह अन्य व्याधींवर उपचार करण्यात येत आहेत. याच्याशी संबंधीत जगात सध्या उपलब्ध असणारी सर्वोत्तम सेवा विघ्नहर्तामध्ये माफक दरात प्रदान करण्यात येत आहेत. आता तर हॉस्पीटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यामुळे बहुतांश विकारांवर विघ्नहर्तामध्ये मोफत उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये मधुमेह, रक्तदाब आदींसारख्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या विकारांचे निदान करण्यासाठीच्या आवश्यक चाचण्या आणि यावरील सर्व उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात या माध्यमातून पहिल्यांदाच अतिशय अद्ययावत आणि तत्पर अशी वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्‍वेश रोठे यांनी याप्रसंगी दिली.

पहा : डॉ. विश्‍वेश रोठे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.

vighnaharta hospital pachora physicians team

विघ्नहर्तामधील फिजीशियन्सचा चमू.

Protected Content