उंबरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गरोदर माता व रक्तगत तपासणी शिबीराला प्रतिसाद

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भार्गवराम बहुउद्देशीय विकास संस्था,परशुरामनगर आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने गरोदर  माता तपासणी शिबिर व रक्तगट तपासणी शिबिर तालुक्यातील दडपिंपरी येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरास डॉ.यशवंत पवार(स्त्री रोग तज्ञ), डॉ.विजय पवार(सर्जन,पुणे), डॉ.संयोगिता नाईक (एमडी पुणे), डॉ. मोहनसिंग राठोड (एम.बी.बी.एस.), डॉ. तुषार राठोड (पॅथॉलॉजिस्ट), श्री.प्रशांत सुभाष पाटील (लॅब टेक्निशियन), जयश्री जायभावे( ए एन एम ),स्वाती साबळे (जी एन एम ),संगीता राठोड (आशा कार्यकर्त्या ),सरला तिरमली (आशा कार्यकर्त्या), कमलबाई सुभाष चव्हाण (अंगणवाडी सेविका) तसेच चित्रा जाधव (रुग्णसेवक मुंबई ),प्रमोद राठोड (रुग्णसेवक मुंबई)  यांच्या उपस्थितीत तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरास प्रमुख पिंप्री खुर्द सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच तकतसिंग पवार, सदस्य  इंदल राठोड, प्रविण राठोड, संजय उत्तम राठोड तसेच ग्रामस्थ यांचीही उपस्थिती लाभली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रोहिदास हरी राठोड, सचिव सुभाष पवार, सहसचिव  जगन चव्हाण, संस्थेचे कोषाध्यक्ष संजय मदन राठोड, सदस्य अनिल पवार, ग्रामस्थ सुदाम चव्हाण, यशोदिप राठोड, नंदू प्रेमसिंग राठोड  व  संस्थेसाठी तत्पर असणारे नेहमी स्वतः कामकाज करणारे दिनकर शिवाजी पवार यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच नवनिर्वाचित पोलीस पाटील, पुंडलिक राठोड यांचाही यावेळी संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.

Protected Content