‘या’ ठिकाणी कॉल करून आपल्याला मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या उपचारामध्ये परिणामकारक ठरणार्‍या Remdesivir Injection रेमडेसिवीर इंजेक्शनची सर्वांना उपलब्धता व्हावी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी खास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून येथे कॉल करून आपल्याला इंजेक्शनच्या उपलब्धतेची अचूक माहिती मिळू शकते. ही बातमी अतिशय महत्वाची असून आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करावी ही विनंती !

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा Remdesivir Injection तुटवडा भासत आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे स्थिती अजून बिघडलेली नसून शासकीय रूग्णालयांमध्ये याचा पुरेसा साठा आहे. मात्र खासगी रूग्णालयांमध्ये याचा तुटवडा भासत आहे. तसेच काही ठिकाणी याचा काळाबाजार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवश्यक असेल त्या वेळेस रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच याबाबत अ‍ॅक्शन प्लॅन आखला असून आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या Remdesivir Injection उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी हे मदत करणार आहेत.

यासोबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांच्या कार्यालयात औषध निरिक्षक अनिल माणिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२१७४७६ असा असून येथे कुणीही चोवीस तास कॉल करून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनाच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवू शकतात. तसेच [email protected] या ईमेल आयडीवरही ही माहिती मिळणार आहे.

दरम्यान, कुणीही सकाळी ७ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रामा एम. भरकड, अन्न सुरक्षा अन्न प्रशासन; प्रविण भगाजी थोंडकर, वरिष्ठ लिपीक;सी.डी.पालीवाल आणि मकरंद झाल्टे, लिपीक यांना आपण कॉल करू शकतात.

दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत किशोर आत्माराम साळुंखे, मिलींद एकनाथ साळी यांच्याशी आपल्याला संपर्क साधता येईल.

तर, रात्री अकरा ते सकाळी सात या कालावधीत आपण संजय भिका सोनवणे आणि मनोहर गुलाब ठाकूर यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात.

रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता वरील क्रमांकावर कॉल करून रेमडेसिवीरबाबत माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Protected Content