मोदी आणि योगी सरकारचा कारभार फक्त जाहिराती आणि भाषणांवर चालतो

 

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । मोदी सरकारनं घेतलेल्या नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउनच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्याबद्दल राहुल गांधी यांनी भाष्य करणारी मालिका सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था की बातमध्ये दुसरा मुद्दा मांडल्यानंतर हाच धागा पकडून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी-योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या,”अर्थव्यवसंस्थेचे कशा पद्धतीनं विभाजन करून टाकलं आहे, हे आता पूर्णपणे समोर येत आहे. नोएडामध्ये ७००० सुक्ष्म व मध्यम क्षमतेचे कारखाने बंद पडले आहेत. लाखो लोकांच्या रोजगाराला टाळं लागलं आहे. देशातील व राज्यातील शासन जाहिराती आणि भाषणावर चालू असून, ज्यामध्ये फक्त खोटंच बोललं जात आहे,” अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेतील दुसरा व्हिडीओ ट्विट केला होता. “मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. जो फासा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम ३१ ऑगस्ट २०२० रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटित अर्थव्यवस्था तोडली,” असं राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं होतं.

Protected Content