रावेर येथे उद्या भाजपा तालुकाध्यक्ष पदासाठी निवडणूक

bjp

रावेर प्रतिनिधी । येथे भाजपा तालुकाध्यक्षपदाची निवडणूक उद्या (दि.25) दुपारी 12 वाजता कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये होणार असून यासाठी भाजपकडून जिल्हा निवडणूक अधिकारी विजय धांडे व दिनेश नेमाडे यांची विशेष उपस्थित राहणार आहे.

विद्यमान तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांचा कार्यकाळ उद्या (दि.25) रोजी संपणार असून श्रीकांत महाजन, तांदलवाडी, वासुदेव नरवाडे विवरे, महेश चौधरी दसनुर, दिलीप पाटील रावेर, उमेश महाजन, रावेर दुर्गादास पाटील निंभोरा, राजेंद्र लासुरकर खिरवळ, मिलिंद वायकुळे, रोझोदा संजय माळी, राहुल पाटील वाघोदा, अॅड. प्रवीण पाचपोहे मुंजलवाडी हे सर्व जण तालुकाध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी रंगणात उतरले असून कोणाच्या गळ्यात भाजप तालुकाध्यक्ष पदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content