बुलढाणा जिल्ह्यात 20 मेपर्यंत कडक लॉकडाऊन (व्हीडीओ)

बुलढाणा, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज 20 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली 

 

जिल्ह्यामध्ये कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी आज 11 मे पासून सुरू करण्यात आली आहे अत्यावश्यक मेडिकल सेवा वगळता इतर आस्थापना पुर्णतःबंद ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे कडक लॉक डाऊनची भूमिका प्रशासनाने घेतली आहे विविध रस्ते बंद करण्यात आले असून वाहतुकीसाठी काही रस्ते सुरू ठेवण्यात आले आहेत रस्त्याने फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून अत्यावश्यक सेवा आणि दवाखान्यात जाणाऱ्या व्यक्तींना सोडण्यात येत आहे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडाची  कारवाई करण्यात येत आहे बुलढाणा शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस रस्त्याने फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करत आहेत .

सध्या कोरोनाचा   प्रादुर्भाव वाढत असताना आजपासून बुलढाणा जिल्ह्यात 20 मेपर्यंत अतिकडक लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे या करिता पोलीस प्रशासन सज्ज झाले असून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांनी देखील रस्त्यावर उतरून आजपासून सुरू झालेल्या कडक लॉक डाउनच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला  लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व नियमाचे पालन करावे असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे .

 

Protected Content