ऍड.सदावर्ते हाजीर हो !

११० अंतर्गत पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ‘सिल्वर ओक’ वरील हल्ला प्रकरणी प्रकरणी नुकतेच तुरुंगवास भोगून आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी कलम ११० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार पोलिसांकडून चौकशीसाठी बोलविण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सेवेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावरील घरावरील हल्प्रकरणी ऍड.सदावर्ते यांना जबाबदार धरुन त्याच्यावर कारवाई करीत अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना सुमारे १६ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर ऍड.सदावर्ते यांना जामीन मंजुरीनंतर जेलमधून सुटका करण्यात आली होती.

एसटी बँकेच्या निवडणूक संदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही नवी संघटना स्थापन करुन सक्रिय राजकारणाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. नव्या संघटनेची घोषणा करुन ४८ तास होत नाहीत तोच  त्यांना पोलिसांनी त्यांना ११० अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते अटकेत असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिसांकडून ऍड. सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content