आरोपींनी केला पोलिसांवर गोळीबार; पालजवळच्या घटनेने खळबळ

रावेर प्रतिनिधी । रावेर-पाल दरम्यान असलेल्या सहस्त्रलिंग गावाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी पोलीसांच्या दिशेने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. 

रावेर पाल दरम्यान असलेल्या आदिवासी सहस्त्रलिंग गावाच्या जवळ पहाटे ३ वाजेच्या सुमारास रावेर पोलीस कर्मचारी (एमएच १९ एम ०६८१)वाहनाने पेट्रोलिंग करत असतांना रावेर कडून पालकडे जात असतांना दुचाकीवर जात असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीसांच्या दिशेन गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात जीवीत हानी अथवा कुणी जखमी झाले नसले तरी त्यांचा गोळीबाराचा हेतू काय असावा हा मुद्दा रावेर तालुक्यात चर्चेचा बनला आहे. हे आरोपी मोठ्या घातपाताच्या किंवा दरोड्याच्या तयारीत होते की अश्या गुन्ह्याच्या नियोजनातील त्यांच्या साथीदारांना सावध करण्याचा त्यांचा गोळीबाराचा हेतू होता या प्रश्नाचा उलगडा मंगळवारी दुपारपर्यंत होत नव्हता. मात्र तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत कोणत्याही मोठ्या घातपाताची किंवा दरोड्याची नोंद झालेली नसल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. तथापी या आरोपींचा गोळीबाराचा हेतू पोलीसांनी सहज समजू नये अशी चर्चा आहे. या आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी पोलीसांना त्यांच्या खबऱ्यांच्या जाळ्या मार्फेतच सुगावा लागू शकतो. मात्र पोलीस त्यांच्या तपासाची दिशा नेमकी काय आहे. हे कुणाजवळच उघडपणे बोलत नसल्याने तालुक्यात पोलीसांच्या भूमीकेबद्दलही उत्सूकता आहे. 

Protected Content