Home क्राईम ट्रकच्या भीषण अपघातात चालकाचा दुदैवी मृत्यू ; गुन्हा दाखल

ट्रकच्या भीषण अपघातात चालकाचा दुदैवी मृत्यू ; गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। मलकापूर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने ट्रक चालक कैलाससिंग प्रेमसिंग यादव (वय ५० वर्ष, रा. नारायण गड, मध्य प्रदेश) यांचा शरीरांतर्गत गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलाससिंग यादव हे आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक आरजे ०९ क्यूसी ६२३३) घेऊन मलकापूरकडून बऱ्हाणपूर रोडने ५ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांनी वाहन अतिशय भरधाव वेगात चालवले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने अचानक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळला आणि उलटला. या घटनेत चालकाला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ट्रकचे क्लीनर गोपाळकृष्ण राधेश्याम नायक (वय ४१, रा. सोमीया, मध्य प्रदेश) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत बोदडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound