मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा- भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसा प्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे पोलिसांच्या तावडीतून निसटले, याप्रकरणी देशपांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मशिदीवरील भोंगे ४ मे रोजी उतरवा अन्यथा दुप्पट आवाजाने भोंग्यावर हनुमान
चालीसा लावू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार
४ मे रोजी राज्यात अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
तशीच नोटीस मनसेचे संदीप देशपांडे यांना देखील बजावण्यात आली होती. यावेळी देशपांडे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते, ते बाहेर पडत असताना नोटीसनुसार देशपांडे यांना बाजूला नेऊन ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, त्यांना गर्दी होऊ नये म्हणून बाजूला घेत असल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी महिला पोलिसाला धक्का देत संदीप देशपांडे आणि सचिन धुरी हे तेथून निसटले असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर सीसीटीव्हि फुटेज, माध्यमांचे कॅमेरे पाहावेत, आम्ही अटकेला घाबरत नाहीत, कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो होतो, असे देशपांडे यांनी सांगितले, परंतु पोलिसांकडून देशपांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.