कला सन्मान पेंटींग प्रदर्शनाचे ३१ रोजी उदघाटन

बोदवड प्रतिनिधी । जागृत मरिमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड, जळगाव (जे.एम.डी ) Planet आर्ट प्रस्तुत कला सन्मान या पेंटींग प्रदर्शनाचे उदघाटन 31आक्टो.2019 रोजी 5.30 वाजता कुमार स्वामी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, काळा घोडा, मुंबई याठिकाणी प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे.

सदरील प्रदर्शन 1 ते 3 नोव्हें. 2019 पर्यंत 11:00 ते 7:00 खुले असणार आहे. कलावंतांना प्लॅटफॉम् मिळावा यासाठी संस्थेचे संस्थापक देविदास राखोंडे आणि सभासद आर्टिस्ट स्वाती यशोदास राखोंडे यांनी या शोचे आयोजन केलेले आहे. शो मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 24 आर्टीस्ट सहभागी झालेले आहेत.

सहभागी आर्टीस्ट यांना संस्थेकडून कलासन्मान हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जे.एम.डी संस्था एक चॅरिटेबल संस्था असून अशा समाज सेवी कामासाठी ओळखली जाते. प्रदर्शन यशस्वीपणे होण्यासाठी धनराज राखोंडे, पूनम चौधरी,फोरम शेठ यांचे सहकार्य लाभलेले आहे. तरी या सोहळ्यासाठी आपण सर्व कला प्रेमींनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन राखोंडे गुरुजी व आर्टिस्ट स्वाती राखोंडे यांनी केले आहे.

सहभागी आर्टिस्ट
स्वाती यशोदास राखोंडे (आयोजक) पंकज पराशर, सचिन खरात, निमिषा भन्साली, जगदीश चंद्रा, मुख्तार एहमद सरदार, विशाखा शेठ ठक्कर, प्राजक्ता जोशी, अलिफया दारुवाला, डॉ वैशाली दास, रुची अरोरा, स्वपन बाला, दिव्या चतुर्वेदी, मेघना पटेल, पूनम आनंद,बाळकृष्ण कांबळे, जितेंद्र चौधरी,सुजित जाधव, स्मृती चिंचनकर, नम्रता मेहता,मेहफूजा बरोदावाला, पल्लवी होटकर, दीपाली संपत यांचा सहभाग होता.

Protected Content