शेतातील पीक नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा – आ. शिरीष चौधरी

फैजपूर प्रतिनिधी | रावेर, यावल परिसरात अतिवृष्टीमुळे ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांच्या दाण्यांना झाडावरच अंकुर फुटले असल्याने ज्वारी व मका पूर्णपणे खराब झाला आहे. तसेच वेचणीवर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. अशा नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशा सूचना रावेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे.

चिनावल येथे आमदार शिरीष चौधरी यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास संबंधित योग्य ती पाऊले उचलण्यास संबंधित त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारने या याबाबत त्वरित लक्ष घालून ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या व नवीन केळी लागवडीचा विमा काढून घेण्याचे घेण्याच्या सूचना संबंधितांना द्यावे अशी मागणी आमदार चौधरी यांनी केली आहे. गेले तीन महिने या विभागात सतत पाऊस पडत असल्याने उडीत, मूग, चवळी, ही पिके शेतकर्यांच्या हातून गेली आहेत. पावसाळा लांबल्याने कापणीवर आलेली ज्वारी व मका पूर्णपणे झाला आहे खराब झाला आहे. निवडणुकीची प्रक्रिया चालू असल्याने या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती आमदार शिरीष चौधरी यांना मतमोजणीनंतर त्वरित मुंबईला जावे लागले असल्याने आज मुंबईवरून परत येताच शेकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

चिनावल येथे पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करताना आमदार शिरीष चौधरी, जि प सदस्य सुरेखा पाटील, माजी सरपंच हेमांगी भंगाळे, बापू पाटील, चंद्रकांत भंगाळे ,योगेश भंगाळे, शरद धोंडे, निखिल खडके, किशोर संजीव महाजन, गणेश पाटील, विश्वनाथ पाटील, नितीन पाटील, कल्पेश नेमाडे, प्रमोद वसंतराव महाजन, यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Protected Content