बच्चे कंपनीने साकारली किल्ले तोरणाची प्रतिकृती

जळगाव, प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवाला जीव देणारे सहकारी मावळ्यांच्या प्रेरणादायी स्मृती आज गड-किल्ल्यांच्या रुपात चिरस्मरणीय असून आपल्याला सतत स्फुर्ती देत आहेत. या गड किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण असलेला तोरणा किल्ल्याची प्रतिकृती चिमुकल्यांनी साकारली आहे.

 

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अलौकिक स्मृती जागविणार्‍या तसेच त्यांच्या कार्याचा आणि पराक्रमाचा शुभारंभ असणा-या किल्ले तोरणाची प्रतिकृती यावर्षी चिमुकल्यांनी साकारली आहे. अतिशय कमी वयात आणि कमी मावळ्यांच्या साथीने किल्ले तोरणा सर करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते.

 

जळगाव येथील नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी,गिरणा टाकीच्या मागे येथे श्रीवरद सुतार, मयूर भंगाळे, पुष्कर महाजन, लक्षिता पाटील, निकेत चौधरी, रेवतेश पाटील, मानस सावंदे, तेजू चौधरी, मानसी सावंदे, युविका पाटील, कृतिका पाटील, दिक्षा , यादवी साळुंके, दिव्या, अंकित पाटील आदी चिमुकल्यांनी किल्ले तोरणाची हुबेहुब साकारुन या अविस्मरणीय स्मृतींचे दर्शन घडविले. त्यांना सुनिता पाटील, भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content