रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धान्याचा ट्रक उलटला (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील दुध फेडरेशन जवळील रस्त्यावरून जात असतांना धान्याने भरलेली ट्रक खड्ड्यामुळे उलटून घरासमोर लावलेल्या कारवर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महापालीकेविरोधात रोष व्यक्त केला.

 

 

शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या अमृत योजनेच्या काम शिवाजीनगर परिसरात देखील या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 

ही अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात त्या कारच्या काचा फुटल्या आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. याबाबत स्थानिक नागरसेवकडे तक्रार केली असता ते  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2459602134174926

 

Protected Content