दानवेंना हवा ब्राह्मण मुख्यमंत्री ! : अजितदादा व खोतकरांनी असे दिले उत्तर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्याला ब्राह्मण मुख्यमंत्री पहायचा असल्याचे वक्तव्य केल्यानंतर याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता परत एकदा त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. जालन्यात ब्राह्मण समाजाकडून भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ब्राह्मण समाजातील व्यक्तीला फक्त नगरसेवक, नगराध्यक्ष पदांवर पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पाहू इच्छितो,’’ असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले.

दरम्यान, रावसाहेब दानवेंनी भाषणा ब्राह्मण समाजातील व्यक्तीले नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांना याच कार्यक्रमात उपस्थित असणारे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टोला लगावला. आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. त्यामुळे, दानवेंनी ब्रह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी. आताचे मुख्यमंत्री तेच आहेत. देवेंद्र फडणवीस होतील तेव्हा होती. देवेंद्र फडणवीस माझे सर्वात जवळचे मित्र आहेत. त्यामुळे विद्वत्तेच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकतं, असं खोतकर म्हणाले.

दरम्यान, या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उडी घेतली. ते  म्हणाले की,  राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही.  तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी १४५ चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल.

 

Protected Content