सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर व यावल तालुक्यात शेती पंप विज ग्राहकांना रात्रीची लोडशेडींग बंद करून तातडीने वीजपुरवठा करावा या मागणीचे निवेदन आमदार शिरीष चौधरी यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘रावेर विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने केळी पिकवणारा प्रदेश आहे. सध्या खुप तापमान असल्याने केळीला जास्त प्रमाणात सिंचन करावे लागते. पण नेमके त्याच काळात रात्री ११ वाजेच्या दरम्यान इमरजन्सी लोड रिलीफ होण्यासाठी सावदा विभागातील रात्रीचे शेती पंप फिडर बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. वास्तविक शेती पंपाला दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा दिला जातो.
दि. ५ व ६ एप्रिल रोजी शेती पंप फिडर बंद ठेवण्याचे आदेश आल्याने शेती पंप बंद ठेवावे लागत आहे. वाढते तापमान असे लोडशेडिंग केळी पिकाला व पर्यायाने शेतकऱ्याला मोठे नुकसानदायी ठरू शकते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.
आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गुरूवार ७ एप्रिल रोजी महावितरणचे श्री. सपकाळे यांची भेट घेतली. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांशी समस्या मांडली. आणि केळीचे पिक वाचवण्यासाठी रात्रीची इमरजन्सी लोड शेडिंग बंद करण्याची विनंती केली.