भालोद येथे कोवीड १९ प्रतिबंधक लसीकरणास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद

यावल प्रतिनिधी | भालोद महाविद्यालयात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे विद्यार्थी विकास विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन युवा स्वास्थ’ अंतर्गत दिनांक २८ ऑक्टोबर रोजी कोविड-१९ पहिला व दुसऱ्या डोससाठी लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरण केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना सदर शिबिरात लसीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लसीकरण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.राहूल चौधरी, डॉ.प्राजक्ता चव्हाण, रवींद्र पालवे, भैरव चौधरी, बी.जी.रामावत, मंगला पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. दिनेश पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मोहिनी तायडे, प्रा.राकेश चौधरी यांच्यासह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सदर लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

प्रास्ताविक डॉ. दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा.मोहिनी तायडे यांनी मानले. यानंतरही लसीकरण मोहीम सुरू राहणार असून ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी डॉ. दिनेश पाटील व प्रा.मोहिनी तायडे यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे..

Protected Content