आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी पाचोऱ्यात बिढ्यार आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी । आदिवासी समाजाच्या राहत्या घरांचा प्रश्न व विविध मागण्या सोडविण्यासाठी बिढ्यार आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील एकलव्य संघटनेतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

शहरात व ग्रामीण भागात आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने स्वातंत्र्य पुर्वी काळापासुन वास्तव्य करत आहे. परंतू स्वातंत्र्याचे ७४ वर्षे होऊन देखील हा आदिवासी समाज पाचरटचे झोपडे बांधुन वास्तव्य करीत असलेल्या जागा नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नसल्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी घुसुन घरात चिखल साचतो त्यामुळे रोगराई व कोरोना सारखा भयानक आजारामुळे भिल समाज खुप त्रस्त झालेला आहे. तसेच जिवंत असतांना आदिवासी भिल्ल समाजाला राहाण्यासाठी जागा नाही. भिल्ल समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर त्याला दफनविधी करण्यासाठी जागा शासनाने आजपर्यंत उपलब्ध करुन न दिल्यामुळे दफनविधी करण्यासाठी ही भिल्ल समाजाला जागेसाठी गावोगावी संपुर्ण समाजाच्या विरोधात अंतविधीसाठी झगडे वाद विवाद करावे लागत असुन अन्यथा कुठेतरी नदी नाल्याच्या कडेला दफनविधी करावी लागते इतके मोठे भयावह वाईट आवस्था केल्यावरही प्रेताची एखाद्या कुत्र्या, मांजरा, प्राण्यापेक्षा वाईट परीस्थितीत प्रेताची विटंबना व कुचंबना होतांना पाहत आहोत. म्हणजेच आदिवासी भिल्ल समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रशासनाचा व लोक प्रतिनिधीचा किती तुच्छ आणि बेजबाबदार आहे. हे सत्य चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसुन येते. म्हणुन वरील मुलभुत हक्क अन्न वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी आज ही या देशाचा आद्य नागरीक म्हणविणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाला आपल्याला भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कासाठी वेळोवेळी, आंदोलनाची भुमिका घेण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे भिल्ल समाजाच्या मागण्यांची ताबडतोब प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नैतृत्वाखाली आदिवासी समाज बांधवांच्या आपल्या कुटुंबासह दि. १७ आॅगस्ट रोजी आपल्या पाचोरा प्रांत कार्यालया समोर आम्हाला न्याय मिळत नाही तो पर्यंत बिढ्यार आंदोलन करण्यात येणार आहे. या होणाऱ्या आंदोलनाबाबत आज दि. ५ रोजी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, तालुका उपाध्यक्ष रोहिदास जाधव यांनी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले आहे. 

 बिढ्यार आंदोलनातील प्रमुख मागण्या

आदिवासी भिल्ल समाज राहत असलेल्या जागा नावे करुन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्यांना राहण्यासाठी जागा नसेल त्यांना शासनाने जागा उपलब्ध करुन तेथे घरकुल योजनेचा लाभ मिळवुन द्यावा, आदिवासी भिल्ल समाजात मृत्यु झाल्यास दफनविधी करण्याची प्रथा आहे. दफनविधी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र दफनविधी करणेसाठी जागा उपलब्ध करुन त्या जागेचा ७/१२ उताऱ्यावर तशी नोंद करुन त्या जागेला वॉलकम्पाऊंड करुन मिळावे, आदिवासी भिल्ल समाज आजरोजी कसत (पिकपेकरा) असलेल्या वन जमिनी व गायरान जमिनींचा ७/१२ उताऱ्यावर नोंद होऊन मालकी हक्क मिळावा, आदिवासी भिल्ल समाजाला जातीचे दाखले व रेशन कार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी, आदिवासी विकास विभागा मार्फत राबविल्या जाणाच्या योजनांपासुन आदिवासी भिल्ल समाज वंचीत राहत आहे. तरी प्रकल्प कार्यालय मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनाचा लाभ मिळवुन द्यावा, शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षीत बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, शबरी घरकुल योजनेचा उदिष्ट वाढवुन मिळावे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन एकलव्य संघटनेतर्फे प्रशासनास देण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content