महाविकास आघाडी सचिनचा अपमान कसा सहन करते ? : फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलनावरून केलेल्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकरवर टीका होत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जोरदार पाठराखण करत यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

अमेरिकी पॉपस्टार रिहानाने सरकारच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केल्यानतर त्याला उत्तर देण्यासाठी सचिन तेंडुलकरने ट्विट केले. त्यांनतर लगेचच नेटकऱ्यांनी सचिनच्या या भूमिकेचा समाचार घेत त्याला चांगलेच ट्रोल केले. सचिनच्या निषेधाचा सूर टोकदार होत असताना केरळमध्ये युवक काँग्रेसने सचिनच्या पोस्टरला काळे फासून त्याचा निषेध केला आहे.

या प्रकारावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त करत,‘सचिन तेंडुलकर हे देशाचे भूषण असून भारतरत्नने सन्मानित आहेत.’ फडणवीस यांनी कोची येथे झालेल्या प्रकाराबद्दल ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच ‘तेंडुलकर हे मराठी माणसाचा अभिमान आहेत त्यामुळे त्यांचा अपमान महाविकास आघाडी कसा सहन करते? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

Protected Content