Home Cities अमळनेर मालवाहू रिक्षातून वाळूची चोरटी वाहतूक

मालवाहू रिक्षातून वाळूची चोरटी वाहतूक

0
100

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पाटील कॉलनी परिसरातून मालवाहू रिक्षातून वाळूची चोरटी वाहतूक करतांना अमळनेर पोलीसांनी गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत वाळूने भरलेले वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विश्वासनिय सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील पाटील कॉलनी परिसरातून मालवाहू रिक्षा वाहनातून बेकायदेशीरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती अमळनेर पोलीसांनी मिळाली. त्यानुसार गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पोलीसांनी कारवाई करत वाळू वाहतूक करणारे रिक्षा (एमएच १७ के ७०१९) क्रमांकाचे वाहन पकडले. चालक नवीद इस्माईल पठाण वय २५ रा. मरीमाता मंदीर, जळगाव याला वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला. दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलीसांनी वाळूने भरलेले वाहन जप्त केले. पोलीस नाईक दिपक माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound