बारी समाजाचे उपाध्यक्ष गणेश बारी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील सुर्यवंशी बारी समाजाचे उपाध्यक्ष गणेश बारी यांनी आ. चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी त्यांचा आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील, भैय्यासाहेब पाटील, देवगांव सरपंच समीर पाटील, उद्योजक अमृत चौधरी, प्रकाश पाटील, उपशहरप्रमुख अनिल चौधरी नितीन बारी, पंकज मराठे, अमोल मराठे, योगेश चौधरी, प्रविण पाटील, योगेश पाटील, विशाल पाटील, मेहु विकासो चेअरमन सुरेश पाटील, शेतकी संघाचे संचालक राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक विलास वाघ, पिंटु बारी, गोरख चौधरी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content