वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याबाबत निवेदन

एरंडोल प्रतिनिधी । वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

वसंत सहकारी साखर कारखान्यातील डिस्टलरी युनिट सुरू केल्यास त्यातून ऑक्सिजनची 1 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल, देशाचे नेते खा.शरद पवार यांनी कोरोनाच्या तिसऱ्‍या लाटेबद्दल चिंता व्यक्त करून साखर कारखान्यानी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करावी अशी सुचना केली होती.

शासनाने ऑक्सिजन स्वालंबन योजना हाती घेतली असून दर दिवशी 1300 मे टन ऑक्सिजन निर्मिती होत असून ही निर्मिती 3000 हजार मे. टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ऑक्सिजन निमिर्ती हाती घेतली आहे या अंतर्गत ऑक्सिजन निमिर्ती करणा-या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली.

कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मागणी होती तरी आता मिशन ऑक्सिजन स्वालंबन अंतर्गत राज्याला ऑक्सिजन निमिर्तीच्या दृष्टीने राज्याला स्वालंबी बनविण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले असून वसंत सहकारी साखर कारखाना येथे आॅक्सिजन प्लांटची उभारणी खूप आवश्यक आहे दुस-या लाटेत ऑक्सिजनचा अभाव असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला तसेच शासनाने सर्वेत्परी ग्रामिण भागाला प्राधान्य दिले असून यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना येथे शासनाने नियुक्त केलेल्या उदयोजक कंपनीला या संदर्भात आदेश दिले असून वसंत सहकारी कारखाना येथे उभारण्याची गरज असून कारखाना कार्यक्षेञात सर्व सुविधा उल्पब्ध होत असल्याने सोईस्कर असून लवकर सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

Protected Content