कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार वेतन मिळण्याबाबत निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । कंत्राटी सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी यांना शासन नियमानुसार किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस (महाराष्ट्र प्रदेश) जिल्हा उपाध्यक्ष आतिश एस. चांगरे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२२) नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

आरोग्य विभाग ई – निवीदा सुचना क्रं. ३५ ई टेंडर आय. डी. २०२१ डी.एम.ए. ७४५६७४१ जा. क्रं. आरोग्य २५.१८. दि. ९ डिसेंबर २०२१ च्या निवेदन नुसार किमान वेतनासाठी या अगोदर नगर परिषदे कडे दि. ३१ जुलै २०१९ रोजी, तसेच सन – २०२० मध्ये ई-निविदा व्यवस्थापन ओला व सुका कचरा, रस्ते सफाई, नाली गटार सफाई घंटा गाडी या सर्व कामांना एक समानतेने किमान वेतन प्रमाणे प्रत्येकी कामगारास १२ हजार ४८८ रुपये वेतन मिळावे. व त्या आशयाच्या मागण्या दि. १३ सप्टेंबर २०२० च्या पत्रानुसार आपण मान्यही केले आहे. परंतु अंमलबजावणी अद्याप झालेली आढळून येत नाही. ई – निवीदा नुसार कामगारास काम न देणे व मजुरी न देणे हे मजुरांच्या व कामगार कायद्याच्या विरोधात आहे. पाचोरा न. पा. यांच्या अधिपत्याखाली सफाई कर्मचाऱ्यांना कामगारांना शासकीय मस्टरवर नोंद करून ३०० रुपये प्रमाणे हजेरी देण्यात यावी, याचा सहानुभुतीपुर्वक विचार होवुन कामगारांच्या बाजुने न्याय करुन किमान वेतन मिळावे. अन्यथा पाचोरा न. पा. विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि. १ जानेवारी २०२२ रोजी आमरण उपोषण आरंभिले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहिल. अशा आषयाचे निवेदन दि. २२ रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आतिश एस. चांगरे यांच्यातर्फे नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना देण्यात आले. याप्रसंगी अ. भा. सफाई मजदुर काँग्रेस संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदरील निवेदन न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले यांनी स्विकारले.

 

Protected Content