सावदा गुरुकुलमध्ये अवतरले ‘प्रतिपंढरपूर’

WhatsApp Image 2019 07 13 at 2.48.30 PM

फैजपूर, प्रतिनिधी | आषाढी एकादशीनिमित्त सावदा गुरुकुलमध्ये स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी माउली.., माउली.., विठोबा रखुमाई.., ज्ञानबा-तुकारामांचा मुखी अखंड जयघोष, हाती भगवी पताका, टाळ-मृदंगाचा गजर करीत सहभाग घेतल्याने स्वामिनारायण गुरुकुलमध्ये ‘प्रतिपंढरपूर’ अवतरल्याचे जाणवत होते.

पंढरपूरचा राजा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारकरी ज्या भक्ती भावाने जात असतात त्याच भक्ती भावाने स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत संत महंत ,विणेकरी , पताकाधारी ,मृदुंग चाऱ्य ,गायक , तुळशी धारण केलेल्या.कलश धारण केलेल्या वारकरी महिलांचा वेष परिधान केलेले विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. नाथ महाराचे भारुड ह.भ.प. मुकेश महाराज यांच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरण तयार झाले होते. मृदुंग चार्य, टाळकरी व गायक कलाकार विद्यार्थी यांनी छान ठेका पकडला होता. विठू माऊलीच्या जयघोषाने गुरुकुलमध्ये पंढरपूरच अवतरले असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. यामधून विद्यार्थ्यांना अनेक गुणांना चालना मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.स.गु.शास्त्री भक्तिस्वरूपदासजी ,प्रमुख पाहुणे प्रा.व.पू.होले, पी.डी.पाटील. प्राचार्य संजय वाघुळदे आदी उपस्थित होते. प.पू.स.गु. शास्त्री श्री भक्तिस्वरुपदासजी यांनी सांगितले की, आज गुरुकुल म्हणजे प्रती पंढरपूर असल्याचा अनुभव झाला. विद्यार्थ्यांना अध्यात्मातून जीवन कौशल्य कसे आत्मसात करायची असतात हे सादर केले. श्री स्वामीनारायण गुरुकुल सावदा मध्ये आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे वारकरी संप्रदायाच्या पध्दतीने दिंडी सोहळा ,अभंग ,भजन,कीर्तन,भारुड सोहळा उत्साहात पार पडला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content