इकरातर्फे ताम्बापुरात साफसफाई अभियान

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत बुधवारी तांबापुरा भागात साफसफाई अभियान राबवण्यात आले.


यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी अब्दुल हमीद चौक ते महादेव मंदिरापर्यंतच्या परिसरात साफसफाई केली. या अभियानाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार अमिनभाई बादलीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रशांत नाईक, सादिक खाटिक, जमीलभाई भंगारवाले व सलमान खाटिक हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. देवानंदा सांखला, प्रा. व्ही. टी. पठाण, प्रा. अजीम शेख, प्रा. वसीम शेख, प्रा. ईश्वर सोनगरे, प्रा. इरफान शेख, अनिस पटेल, अब्दुल रज्जाक, रईस शेख व जफर अली हे यावेळी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content