‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणी पुण्यातून पत्रकाराला अटक

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचारीवर्ग आणि अन्य आंदोलकानी हल्ला केल्याप्रकरणी पुण्यातील एका यु ट्यूब चॅनेल चालविणाऱ्या पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यास अटक करण्यात आली. बुधवार दि. १३ रोजी दुपारच्या सुमारास सूर्यवंशी नामक पत्रकाराला पोलिसांनी अटक केली असून मुंबईमध्ये आणण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यापासून विलीनीकरण आणि अन्य मुद्द्यावर संप सुरु होता. याचा निकाल ४ किंवा ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाकडून दिला जाणार होता. दरम्यान निकाल जाहीर होऊन आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांकडून काही वेळ जल्लोषदेखील करण्यात आला. त्यांनतर पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला. या प्रकरणी ११५ पैकी १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर आज दुपारी पुण्यातील एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

आंदोलनापूर्वी पवार यांच्या घराची पाहणी करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी माहिती घेत कट रचल्याप्रकरणी हनुमंत वाघमारे, कृष्णांत कोरे, मोहम्मद ताजुद्दीन व गोविंद म्हसरणकर यांना आझाद मैदान येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. तर् याच प्रकरणामध्ये ११ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्वर ओक हल्ला प्रकरणात आतापर्यंत ११५ जणांना अटक करण्यात आली असून १०९ जणांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर याच हल्ल्याच्या प्रकरणात पुणे येथील एमजेटी मराठी न्यूज युट्युब चॅनेल चालविणाऱ्या पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. दरम्यान याच प्रकरणात पत्रकाराला पुण्यातून अटक झाल्याने अजून बरीच नवीन माहिती समोर येईल असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Protected Content