Home Cities जळगाव पालकमंत्र्यांना धक्का : जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीकडे !

पालकमंत्र्यांना धक्का : जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीकडे !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला असून मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत संपादन केले आहे.

 

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीच्या पॅनलची धुरा ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे होती. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व हे त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी तथा माजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे करत होते.

 

आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने पहिल्यापासून आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. यात १८ जागांपैकी १० जागा जिंकून महाविकास आघाडीचे विजय संपादन केला. शिंदे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले असून एक ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाली. या निकालामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound