शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा ; दुबार पेरणीचे संकट कोसळू नये याबाबत चिंता ..!

जळगाव प्रतिनिधी। गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या आहेत ,तर काही ठिकाणी शेतकरी राजा पेरणी करतानाचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी निंदनीही सुरू आहे.

ज्यांनी अगदी सुरुवातीलाच पेरण्या केल्या , ते शेतकरी पावसाची वाट पाहत असून काहीसे चिंताग्रस्त दिसून येत आहेत. आता पेरणीवर पाऊस नसल्याने एरंडोल , पाचोरा , अमळनेर , चोपडा आदी भागात कोवळ्या कोबांना कोऱ्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.आधीच बी- बियाणे महाग त्यातही लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीला सामोरे जात आहे. दुबार पेरणीचे संकट तर कोसळणार नाही ना ? या विवंचनेत शेतकरी वर्ग दिसत आहे. दरम्यान रावेर , यावल , भुसावळ , बोदवड येथे पिके चांगलीच फुलली असून एक ते दीड फुटापर्यंत वाढली आहेत .या भागात शेतकरी समाधानी दिसून येत आहे. कापूस , ज्वारी , हळद , अद्रक यासह इतरही पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत .चांगला पाऊस बरसावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Protected Content