Home धर्म-समाज भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा

भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा

0
34


भुसावळ, प्रतिनिधी । येथे रेल्वे विभागात आज अंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत इंटरनेटच्या माध्यमातून सकाळी सात वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उपक्रमात डीआरएम विवेक कुमार गुप्ता , एडीआरएम मनोजकुमार सिन्हा , सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिवारातील सदस्य यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आणि योग साधना घरूनच केली. ह्या ऑनलाईन योग सत्रामध्ये योग साधनेचे प्रात्यक्षिक योग शिक्षक एन. पी. परदेशी यांनी सादर केले. सूत्रसंचालन रेल्वे स्कूल प्राचार्य सतीश कुळकर्णी आणि रेल्वे स्कूल ग्रंथपाल संतोष उपाध्याय यांनी केले. त्यांनी प्रत्येक आसनाची माहिती आणि लाभ याची माहिती विषद केली. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्कूल उप प्राचार्य स्वाती चतुर्वेदी , रेल्वे स्कूल कला शिक्षक आर. पी. जावळे , शिक्षकेतर कर्मचारी, देवेंद्र विश्वकर्मा, डी. बी. ए. आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार सिनी डी पी ओ एन. डी. गांगुर्डे यांनी मानले. यशस्वितेसाठी कार्मिक शाखा भुसावळ येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


Protected Content

Play sound