पंतप्रधानांची फोनवर कोरोना परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबद्दल आज पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याशी चर्चा केली

 

देशात  दुसऱ्या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत  संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी  रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.   अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. देशातील  परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी  प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत  आढावा घेत आहेत.

 

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार आहे.  भाजपा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे राज्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे.  भाजपा सत्तेत नसलेल्या राज्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप भाजपा विरोधी पक्ष वारंवार करत आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याने राज्यातील  अडचणी दूर होतील अशी आशा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.

 

राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. ३७ हजार ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घऱी सोडण्यात आलं आहे. राज्यात एकूण ६ लाख ५४ हजार ७८८ करोना रुग्ण अॅक्टिव्ह आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.३६ टक्के इतकं आहे. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Protected Content