विनयभंग झालेल्या महिलेची तक्रार न घेता सलग चार दिवस पोलिसांनी टाळले

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पोलिस हे नागरिकांच्या संरक्षणसाठी असतात. पण अकोला शहरात एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेचा पोलिसांनी तक्रार न घेता सलग चार दिवस रात्री ताळत ठेवले. ही महिला एका नामांकित डॉक्टरवर विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. या महिलेला दोन वर्षांची मुलगी आहे. त्या महिलेला रात्री २ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून तिचा मानसिक छळ पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टरच्या दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचाही आरोप तक्रारदार महिलेने केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरतल्या जठारपेठ भागात चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक हा डॉ. प्रविण अग्रवाल यांचा दवाखाना आहे. त्वचारोगावरील उपचारांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र, शहरातील एक घटस्फोटीत महिला त्यांच्याकडे उपचारासाठी गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. डॉक्टरांकडून याआधी तीनदा असा प्रकार झाल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, सामाजिक भितीमुळे तिने याची वाच्यता कुठे केली नाही. मात्र, चौथ्यांदाही या डॉक्टरने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यावर तिने यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. प्रविण अग्रवाल विरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह सायंकाळपासून ते रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवले गेले.

त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिस अधिक्षकांकडे महिला पोलिस अधिकाऱ्याची मागणी केली आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकर गुन्हा दाखल होणार. पण विशेष म्हणजे एका महिलेला रात्री 2 वाजेपर्यत ताटकळत पोलिस ठाण्यात बसवून ठेवल्या जातंय हे योग्य आहे का? असा सवाल पत्रकारांनी जाधव यांना विचारला असता, ते म्हटले महिलेला रात्री 7 वाजेनंतर अटक करता येत नाही. परंतु तक्रारदार महिला कितीही वेळ ठाण्यात थांबू शकते असे जाधव यांचे म्हणणे हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते.

Protected Content