टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी महिला संघाची घोषणा

team india1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय महिला संघाची आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा बीसीसीआयने केली असून या संघाचे नेतृत्व हमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आले आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ‘ए’ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना सिडनीत २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा सामना २४ फेब्रुवारी रोजी बांगालदेशविरुद्ध पर्थ येथे होणार आहे. तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न येथे २७ रोजी खेळवला जाईल.
साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध २९ फेब्रुवारी रोजी मेलबर्नमध्ये होईल. साखळी फेरीनंतर ‘ए’ आणि ‘बी’ ग्रुपमधील टॉप संघ सेमीफायनलमध्ये खेळतील. दोन्ही सेमीफायनल ५ मार्चला मेलबर्न मैदानावर तर फायनल लढत ८ मार्च रोजी मेलबर्नवरच होईल.

भारतीय महिला संघ :- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जॅमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रीचा घोष, तानिया भाटीया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर आणि अरुंधती रेड्डी

Protected Content