Home Cities धरणगाव उखळवाडीत सेवानिवृत्त जवानाचे जंगी मिरवणूक

उखळवाडीत सेवानिवृत्त जवानाचे जंगी मिरवणूक

0
106


crpf jawan

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उखळवाडी येथील रहिवासी असलेले सीआरपीएफमधील जवान विकास बापूराव पाटील हे लष्करातून सेवानिवृत्त झाले आहे. यानिमित्त ग्रामस्थांनी त्यांची जंगी स्वागत करत शहारात घोड्यावरुन भव्य मिरवणूक काढली आहे.

मिरवणूक काढल्यानंतर सेवापूर्ती सोहळा घेण्यात आला. विकास पाटील हे वयाच्या 21व्या वर्षी लष्कारात रुजू झाले होते. त्यांचे लहान बंधू संदीप पाटील हे उखळवाडी गावाचे माजी सरपंच होते. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, तंटामुक्ती अध्यक्ष, भष्ट्राचार निर्मूलन पदाधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.


Protected Content

Play sound