त्रालमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

terror 1 696x447

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलासोबत आज रविवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. ही चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी वस्तीत दोन ते तीन दशहतवादी घुसले होते. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्याना ठार करण्यात यश आले आहे. तर अद्यापही परिसरात दहशतवादी दडून बसलेला असल्याने दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी त्यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या भारतीय जवानांच्या चौक्या व गावांना लक्ष केले गेले. पाकिस्तानकडून रात्री साधारणपणे साडेनऊ वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांनी पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या देगवर सेक्टरमध्ये गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला, त्यांच्या या हल्ल्यास भारतीय जवानांकडून देखील चोख प्रतित्युत्तर देण्यात आले.

Protected Content