संयमी राजकारणी पवारांचे मौन, उन्मादी कार्यकर्त्यांना पाठबळ – भाजपचा आरोप

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात उन्मादी कार्यकर्ते आणि पोलीस याच्या समन्वयाने गुंडगिरी केली जात आहे. यात संयमी राजकारणी अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांच्या मूकसंमतीमुळेच उन्मादी कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा शांततेने जगण्याचा हक्क संकटात आला असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी अंतर्गत सत्तासंघर्षातून वैफल्यग्रस्त आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधाऱ्यांकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या विधानाने वैफल्यग्रस्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कायदा हातात घेऊन केलेली दहशत निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना गृहखात्याकडून पोलिसांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले असून दहशतीच्या मार्गाने विरोधकांना संपवण्यासाठी कुटील डाव सत्ताधारी महाविकास आघाडीकडून केला जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्याला वेठीस धरले जात असेल तर पवार यांनी त्यांना आवर घालावा, असे आवाहन उपाध्ये यांनी केले आहे.

पालघरच्या साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर अभियंत्याला पोलीसासमोर केलेली मारहाण, गोपीचंद पडळकर, भाजपाचे विनायक आंबेकर यांना झालेली मारहाण किंवा केंद्रीय मंत्री यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीला मारहाणीचा प्रयत्न हे सर्व राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचेच दिसून येत असल्याचाही आरोप उपाध्ये यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

Protected Content