आगीत घर जळालेल्या महिलेला आर्थिक मदत

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील ज्योतीबाई भोई यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते. सामाजिक बांधलकी जोपासत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांनी ज्योतीबाई यांना आर्थिक मदत दिली आहे.

 

काही दिवसांपूर्वी ज्योतीबाई भोई यांच्या घराला लागलेल्या आगीत धान्य, पैसे, कपडे, भांडे, कागदपत्रे व इतर संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते. या घटनेने त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली त्यांच्या मदतीसाठी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने फुल नाही पण फुलाची पाकळी असे २५ हजारांची मदत करण्यात आली. ज्योतीबाई भोई ह्या विधवा आहेत व त्यांच्यावर ४ मुलींच्या लग्नाची जबाबदारी आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अनेक दाते मदतीसाठी पुढे येत असतांना त्यांना मदत म्हणून विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांचेतर्फे २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी ज्योतीबाई भोई यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Protected Content