शिवछावा संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी निवेदन

पारोळा प्रतिनिधी । येथील कुटीर रूग्णालयात कोविड व नॉन कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासह विविध मागण्यांसाठी येथील शिवछावा संघटनेतर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोव्हिड-१९ (कोरोना) प्रादुर्भावाची परिस्थिती अतिशय भयावह आहे. त्या अनुषंगाने कुटीर रुग्णालय पारोळा येथे कोविड पेशंट व ईतर आजारांचे पेशंट एकमेकांचा संपर्कात येत आहेत. या कुटीर रुग्नालयामध्ये दोन बिल्डीग असुन एक जुनी असून दुसरीत ट्रामा केअर सेंटर बिल्डींग आहे. यात इतर रूग्णांचे व्यवस्थापन हे संपुर्ण रित्या ट्रामा केअर सेंटर च्या बिल्डींग मध्ये करण्यात याव्यात. यामध्ये  मेडीकल ऑफीसर, केस पेपर ईतरत्र सगळ्या सुविधा ट्रामा केअर सेंटर च्या बिल्डींग मध्ये हलवण्यात याव्यात. यामुळे कोविड व नॉन कोविड रूग्णांमध्ये अंतर राखले जाईल.

दरम्यान, यंदा अतिवृष्टीने शेतकरी व शेत मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच कोरोना आल्याने सर्वांची आर्थिक स्थिती खालावली आहे. यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी. तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आरोग्याच्या दृष्टीने शुध्द पाणी पुरवठा करून जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शिवछावा संघटना जिल्हाध्यक्ष सागर भोसले,जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील व तालुकाअध्यक्ष कपिल चौघरी तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील व शहराध्यक्ष उमेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी २८ रोजी रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा यात देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

Protected Content