मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच – मुख्यमंत्री

 

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून यासाठी तज्ज्ञ वकिलांकडे ही कामगिरी सोपवली असल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एपीएमसी मधील माथाडी भवनमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकार मराठा समाजाबरोबर आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यास कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या हक्काची ही लढाई जिंकणार आहेत. तसेच यासाठी तज्ज्ञ वकिलांकडे ही कामगिरी सोपवली आहे. असे सांगितले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर काही डोमकावळे चोची मारत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी माथाडी कामगार आणि शिवसैनिक समर्थ आहेत असे वक्तव्य केले. तसेच मुंबईत मराठी माणसाचे स्थान टिकवण्यासाठी काम करु असेही आश्वासन दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माथाडी नेते अण्णाभाऊ पाटील यांचे स्वप्न पूर्ण करुया असे म्हणत एकत्र काम करण्याचे आवाहनही केले.

Protected Content